तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान देशपांडेंचं ट्विट

मुंबई : मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे खा. बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यात आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही बृजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा फोटो ट्टिट करत निशाणा साधला आहे.

संदीप देशपांडे यांनी शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एकत्रित फोटो शेअर करत म्हटलं आहे की, तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांविरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, या दोन्ही नेत्यांचा एकाच व्यासपीठावरील फोटो शेअर करत मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांचा दौरा रद्द होण्यामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात राजकारण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share