Dhanteras 2022 : जाणून घ्या धनत्रयोदशी दिवशी काय खरेदी करावे, काय नको?

वसुबारसेच्या दुसऱ्या दिवशी येते धनत्रयोदशी. धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणातात. या दिवशी धन-संपत्तीचे पूजन केले जाते. पूजा करणे म्हणजे महत्त्व ओळखणे, प्रेमाने आवाहन करणे. धन्वंतरीची पुजा धनत्रयोदिवशी केली जाते. धन्वंतरी ही आरोग्याची देवता धनसंपत्तीची देवता होय. या दिवशी सोन-चांदीचे दागिणे, भांडी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे दरवर्षी धनत्रयोदशी दिवशी लोक विविध वस्तू दाग दागिण्यांची खरेदी केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का धनत्रयोदिवशी कोणत्या वस्तू खरेदी करव्या आणि कोणत्या खरेदी करु नये.

धनत्रयोदशीला काय खरेदी करावे?

१. लक्ष्मी देवी किंवा श्री गणेशाची मूर्ती
धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मी देवी किंवा श्री गणेशाची मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सुख, समृध्दी लाभते

२.चांदी
धनत्रयोदशी दिवशी चांदीची नाणे, दागिन्यांची खरेदी करणे शुभ मानले जाते. लक्ष्मी पुजेच्या दिवशी या वस्तूंची पुजा केली जाते.

३. पीतल
समुद्र मंथनातून जेव्हा धन्वंतरी देवी प्रकट झाली होती तेव्हा तिच्या हातात पितळ्याच्या कलशामध्ये अमृत होते असे मानले जाते. त्यामुळे धन्वंतरी देवीला पितळ प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदिवशी पितळीच्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते.

४. झाडू/ केरसुनी
धनत्रयोदशीला झाडू/ केरसुनी खरेदी केली जाते. केरसुनीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो असे मानले जाते. केरसुनीचा वापर केल्याने घरातील दारिद्य नष्ट होते आणि घरात सकारात्मक उर्जेचा वास होतो असे म्हणतात.

५. मातीचे दिवे
दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी मातीच्या दिव्यांची खरेदी केली जाते. या दिव्यांशिवाय दिवाळी सण पूर्ण होत नाही. बाजारात मातीच्या दिव्यांमध्ये अनेक डिजाईन्सचे, चांगल्या गुणवत्तेचे दिवे मिळतात.

धनत्रयोदिवशी काय खरेदी करु नये
१. लोखंडाच्या वस्तू : लोह हे शनिदेवाचे प्रतिक मानले जाते, त्यामुळे धनत्रयोदशीला लोखंडाच्या वस्तू खरेदी केली जात नाही.

२. स्लीट/अॅल्युमिनिअमची भांडी : स्लीट/अॅल्युमिनिअम राहूचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला स्लीट/अॅल्युमिनिअमची भांडी खरेदी करणे वर्ज्य असते.

३. प्लॅस्टीक, काच आणि चिनी मातीची भांडी : धनतेरसच्या दिवशी प्लॅस्टीक, काच आणि चिनी मातीची भांडी वस्तू खरेदी केली जात नाही.

Share