रेणा प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडले; शेतशिवारात घुसले पाणी

लातूर : रेणापूर परिसरातील पानगाव, भंडारवाडी, घनसरगाव येथे ढगफुटी होऊन शेतशिवार तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रेणा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदी काठचे सोयाबीनच्या बनिमी तसेच शिवारात जमा केलेले सोयाबीनचे ढीग वाहुन जाण्याच्या घटना घडल्या. फुलाबाई गोपाळ आकनगिरे, महादु किसन केंद्र, गुंडु बरुळे, आतराम बरुळे, नितिन गुंडू बरुळे, दिलीप बरूळे, नितिन वांगे यांच्यासह रेणा नदी काठच्या शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Share