हवेवर पोट भरणाऱ्या मशीनचा शोध…जितेंद्र आव्हाड

मुंबई :  देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड पडू लागला आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे देखील दर वाढू लागले आहेत. त्यामुळे आर्थिक गणित बिघडू लागलेलं आहे. यावरुन राज्याचे  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट मध्ये म्हटंल की, भारतातील डिझेल, पेट्रोल, गॅस, फळभाज्या, कडधान्य व खाण्यापिण्याच्या वस्तुंच्या दरांचा चढता आलेख बघून अमेरिकेतील एका वैज्ञानिकाने हवेवरती पोट भरणाऱ्या मशीन्सचा शोध लावला आहे. भारतीय बाजारपेठेत लवकरच ती उपलब्ध करण्याची घोषणा त्याने न्यूयॉर्क मध्ये केली आहे  असं आव्हाडांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ९ वेळा वाढ करण्यात आली आहे. तर र डिझेल ६ रुपये ४० पैशांपर्यंत महागलं आहे. सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी १०१.८१ रुपये आणि डिझेलसाठी ९३.०७ रुपये खर्च करावे लागत आहेत. यापूर्वी २१ मार्च रोजी राजधानीमध्ये पेट्रोलचे दर ९५.४१ आणि डिझेलचे दर ८७.६७ रुपयांवर होते.

Share