‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ विजेते डिसले यांच्या अडचणी वाढ

सोलापूरः  जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ विजेते रणजितसिंह डिसले यांच्याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिले होते. तर आता डिसले यांचा नवीनच आरोप जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी केला आहे. या यांच्या आरोपा मुळे डिसलेच्या अडचनीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा परिषदेच्या सभेत रणजित डिसलेंविरोधात निषेधाचा सूर दिसून आला. डिसले यांनी पुरस्कारासाठी परितेवाडी हा आदिवासी भाग आहे. लोक कन्नड भाषिक असून झेडपी शाळा गोठ्यात भरते. तसेच येथे ८० टक्के बालविवाह होतात, अशी खोटी माहिती पुरस्कारासाठी दिल्याचा आरोप झेडपीच्या ऑनलाईन सभेत भारत शिंदे यांनी केला.

काय आहे प्रकरण?
ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले गुरूजी यांना अमेरिकेत फुलब्राईट स्कॉलरशीप मिळाली होती. ही स्कॉलरशीप 6 महिन्यांची आहे. त्यासाठी रणजितसिंह डिसले यांनी रितसर जिल्हा परिषद प्रशासनाकडे रजेचा अर्ज केला होता. पण याच अर्जावरून वाद निर्माण झाला. रणजितसिंह डिसले गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने कामाच्या ठिकाणी गैरहजर राहत आहेत. त्यांची प्रतिनियुक्ती झालेल्या ठिकाणीही ते सतत गैरहजर असतात. त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे, तसंच अर्जातही त्रुटी असल्याचं कारण देत डिसले यांचा अर्ज मंजूर करण्यात येत नव्हता, असा आरोप सोलापूरचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. किरण लोहार केला होता.

Share