सचिवांच्या गैरवर्तन प्रकरणी राज्यातील डाॅक्टर सामूहिक रजेवर

मुंबई- राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक गेली अनेक वर्षे रुग्णालयात कार्यरत असून कोरोना काळातही त्यांना अखंड सेवा दिला आहे. या प्राध्यापकांची सेवा नियमित करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिले होते. परंतु दोन वर्ष झाली तरी यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ५ जानेवारीपासून या प्राध्यापकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.यावर चर्चा करण्यासाठी या प्राध्यपकांचे शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षण विभआगाच्या सचिवांची भेट घेण्यास गेले असता त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आलाच्या निषेधार्थ  शुक्रवारी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी प्राध्यापक सामूहिक रजेवर गेले होते.

आपल्या मागण्या मांडण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संघटनेचे शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय यांना गुरुवारी भेटायला गेले होते. परंतु सचिवांनी संघटनेच्या सदस्यांना अपमानित करून असंसदीय भाषेचा वापर केला, असा आरोप आहे. या घटनेचा निषेध करत राज्यभरातील सुमारे अडीच हजार प्राध्यापक शुक्रवारी सामूहिक रजेवर गेले होते. आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवांवर डॉक्टरांनी बहिष्कार टाकला होता.

Share