हूकूमशाही विरोधात कझाकिस्तानात असंतोष

**आंतरराष्ट्रीय-** हुकूमशाहीची राजवट असलेल्या कझाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवासांपासून संघर्ष सुरू आहे. नागरिकांनी इंधनदर वाढ विरोधात एल्गार पुकारला होता. एल्गाराने आंदोलने सुरु झाली आणि काही सरकारी स्थळांवर हा मोर्चा काढण्यात आला . अध्यक्षीय निवासस्थआन, महापौर, कार्यायल यांची तोडफोड केली.या संघर्षा दरण्याम अनेक मोर्चेकरी जखमी झाले आणि मृत्यूमुखी देखील पडले. यात १२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.तर यात एका पोलिसाचा आंदोलकांकडून शिरच्छेद करण्यात आला.

अध्यक्षकांनी सुरुवातीला आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला. देशात दहशतवादी गट अराजक माजवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी रशियाच्या नेतृत्वाखालील संयुक्त लष्कराला मदतीसाठी पाचारण केले. या संघर्षांच्या पार्श्वभूमी कझाकिस्तानातील तीन विमानतळ बंद करण्यात आले आहेत.

तीन दशकांपूर्वी सोव्हिएत संघापासून स्वातंर्त्य मिळाल्यानंतरचे कझाकिस्तानातील हे सर्वात मोठे आंदोलन असून गेल्या काही दिवसांत हजारो लोक, काठय़ा आणि स्वसंरक्षणासाठी ढालीसारखी साधने घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.इंधनाच्या किंमती जवळपास दुप्पट केल्यामुळे देशात आंदोलन पेटले असले तरी दीर्घकाळापासून एकाच पक्षाची राजवट असल्याने सरकारविरोधातील असंतोषाने हिंसक रूप धारण केले आहे.

कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीवरून रशियन नेतृत्वाखालील संघटनेचं सैन्य बंड मोडीत काढण्यासाठी मैदानात दाखल झालं आहे.एका बाजूला देशातील सरकारविरोधी हिंसक आंदोलनांमुळे नुकतीच आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, आता रशियाने यामध्ये एन्ट्री घेतल्याने पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Share