मराठमोळ्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण

मुंबईः देशात कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताणा दिसत आहे .बाॅलिवूड पाठोपाठ मराठी सिनेसृष्टीत देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मराठी सिनेअभिनेता अंकुश चौधरी नंतर मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरला कोरोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडिया पोस्ट करत या बाबद माहिती दिली आहे.

मराठमोळी अभिनेत्री मिथिलाने पोस्टमध्ये लिहिले, ‘वाढदिवस असणाऱ्या आठवड्याची सुरुवात करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून झाली आहे. मला माहितीये हे फार वाईट आहे. मला सैम्य लक्षणे जाणवू लागली होती. मी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे. मित्र परिवार आणि कुटुंबीयांशी मी व्हर्चुअली संवाद साधत असते. मी माझ्या कुटुंबापासून लांब आहे. गेल्या १० दिवसांमध्ये मी ज्यांच्या संपर्कात आले त्यांना देखील मी माहिती दिली आहे. मी तुम्हाला आवाहन करते की मास्क लावून फिरा आणि सुरक्षित रहा’

Share