मुंबई- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी पहाटे ईडीने छापा टाकत त्यांना ताब्यात घेत चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणण्यात आले आहे. यातच मलिकांच्या कार्यालयातून एक ट्विट शेअर करण्यात आलं आहे.
ना डरेंगे ना झुकेंगे!
Be ready for 2024!#WeStandWithNawabMalik
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ईडीने मलिकांच्या घरी छापा टाकत त्यांना ताब्ययात घेतले आहे. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले . पाच तासापासून मलिकांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी मलिकांच्या कार्यालयातून एक ट्विट शेअर करण्यात आले . त्या ट्विटमध्य़े म्हंटल आहे की, ना डरेंगे ना झुकेंगे, २०२४ च्या निवडणूकीसाठी तयार राहा. यातून मलिकांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.