द्यानेश्वर चव्हाण: वक्तव्य

जालना जिल्ह्यात आंदोलकांवर लाठीमार केला गेला. लाठीमाराच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. राज्यातील राजकारण पेटलंय. आमदार रोहित पवार, उद्धव ठाकरे, संभाजीराजे यांनी अंतरगाव सराटी गावात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. ५० च्या वर जण लाठीमारात जखमी झालेत. हा लाठीमार का करण्यात आला? यासंदर्भात आता पोलीस महानिरीक्षकांनी खुलासा केलाय, पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, मंगळवारपासून मनोज जवांगे यांनी उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती खालावत होती. तसा वैद्यकीय अधीक्षकांनी अहवाल दिला. त्यानुसार, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोणातून त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ते तयारही झाले होते. पण, काही जनसमुदायाचा विरोध होता. त्यामुळे जनसमुदायाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. एसआरपीचे जवान जखमी झाले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला.

Share