दिल्ली- ईडीच्या रडारवर महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगाल असल्याचं दिसत आहे. नुकतच ईडीने तृणमूलच्या सरचिटणीसांना व त्यांच्या पत्नींना नोटीस पाठवली आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना ईडीने नोटीस पाठवत दिल्ली येथे हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत. नुकतच तृणमूल मधील तीन चार नेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या बाजून आहे अशी टिका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
ED again summons TMC's Abhishek Banerjee, his wife in coal scam
Read @ANI Story | https://t.co/2M6puBwqr6#enforcementdirectorate pic.twitter.com/0qxCyA29lr
— ANI Digital (@ani_digital) March 17, 2022
अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली आहे. रुजिरा बॅनर्जी यांनी न्यायालयात ईडीच्या तक्रारीविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना ईडीला बॅनर्जी पती-पत्नीला नोटीस बजावण्याची परवानगी दिली आहे. तसेच, दिल्लीमध्ये त्यांची चौकशी करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. याआधी ईडीने पश्चिम बंगालचे मंत्री मोलॉय घातक यांना कोळसा घोटाळा प्रकरणात नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे सीबीआयनं तृणमूलचे बिरभूम जिल्ह्याचे प्रमुख अनुब्रता मोंडल यांना नोटीस बजावली आहे.