होळीचे निर्बध राज्यातील जनतेच्या हितासाठी – संजय राऊत

मुंबई : राज्यात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साजरा करण्यावर सरकारने प्रतिबंध घातले होते. यंदा उत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शन सुचना जारी केल्या आहेत. त्या संदर्भातील नियमांचे पालन नागरिकांना करावेच लागणार आहे. या नियमावलीनुसार, रात्री १० वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाहीये. तसेच डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळेच डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वरुन भाजपा नेते टीका करत असून हिंदू सणांना विरोध का? अशी विचारणा करत आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रातला विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यांनी त्यांचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही सुचना घ्यायला हव्यात. संपूर्ण देशात आजही कोरोनाची भीती कमी झालेली नाही. चीनमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी लाॅकडाऊन लागत आहे. केंद्र सरकारनेदेखील काही निर्बंधांचं पालन करा असं सुचवलं आहे. महराष्ट्र सरकाने त्यांसदर्भात काही नियम निर्बंध ठेवले असतील तर राज्याच्या आणि लोकांच्य हितासाठी आहेत. असं खा. संजय राऊत म्हणाले आहेत.

विरोधी पक्षाने विरोध करुन नये. विरोधासाठी विरोध करत लोकांचे जीव धोक्यात घालण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास ते तयार नाहीत. सत्ता येत नसल्याने वैफल्य येऊ शकतं, पण ते अशा टोकाला जाऊ नये की आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे   बळी जावेत आणि त्याचेही राजकारण करत सरकारला धारेवर धरता यावं हे चुकीचं आहे. इतकं क्रूर पद्दतीचं, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं आणि करु नये,असंही यावेळी ते म्हणाले.

Share