Elections 2022 : आधी मतदान मगच दुसरे काम – पंतप्रधान मोदी

नवी दिल्लीः पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्य दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण ५५ विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. तर गोव्यात ४० , उत्तराखंड ७० विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन राज्यांमधील मतदान सुरु होण्याआधी ट्वीट केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हणाले की, ‘उत्तर प्रदेश विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासह उत्तराखंड आणि गोव्यात सर्व जागांसाठी मतदान आज पार पडत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, या पावन पर्वात सहभागी व्हा. मतदानाचा नवा विक्रम बनवा. लक्षात ठेवा, आधी मतदान, मगच दुसरं काम असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Share