फडणवीसच तुमचा बाजार उठवणार- भातखळकर

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडीओ बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील  यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.  याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सूचक ट्विट केलं आहे.

भातखळक यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, देवेंद्र आहेत ते बोलतात तेव्हा तलवार तळपते. ते भ्रष्टाचाऱ्यांचा बाजार लवकरत उठवणार आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार आहेत.त्यामुळे सरकारने सावधानगिरी बाळगली पाहिजे असं या असं सूचक ट्विट भातखळकरांनी विरोधकांवर टीका करत केलं आहे.

दरम्यान फडणवीसांनी थेट विधानसभेतच पुरावे सादर केल्याने त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज सभागृहात सरकारच्यावतीने स्पष्टीकरण देणार का? अशा चर्चा आता रंगत आहेत. तसेच नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे राजकारण अधिकच तापलेले दिसत आहे.

Share