ओटीटी प्लॅटफॉर्म बद्दल महिला आमदारानी केली ‘ही’ मागणी

मुंबई : गृहखात्याशी संबंधित पुरवणी मागण्यांवर राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपली मतं मांडली. आज मोबाईलवर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेब सिरीज, चित्रपट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी लहान मुलेही सहजपणे वेब सिरीज आदी गोष्टी पाहत असतात. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या कटेंटबाबत कोणताही कायदा करण्यात आलेला नाही. महिला ही केवळ उपभोगाची वस्तू असल्याचे चित्र याद्वारे दाखविण्यात येत असते. महिलांचे हे ओंगळवाणे प्रदर्शन थांबविण्यासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार अहिरे यांनी केली.

देवळालीमधील गिरनार येथील ग्रामीण रुग्णालयावर खूप भार येत आहे. आदिवासी समाजाचे अनेक रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून असल्यामुळे या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी केली. आदिवासी महिला आणि बांधवाना यांना या रुग्णालयामुळे चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळेल. तसेच, भगूर येथील रुग्णालय मंजूरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले आहे. त्यांनी ते लवकर मंजूर करावे असे त्यांनी सांगितलं.

Share