खोटा इतिहास महाराष्ट्रात कधीही यशस्वी होणार नाही…

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याच्या राज्यात उमटू लागले आहेत. यावरच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

आ. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये  म्हटलं आहे की, खरा इतिहास माहीत करुन न घेता अजेंडा  रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती.”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच खरा इतिहास माहीत करुन न  घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. #राज्यपाल_माफी_मागा’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राज्यपाल?

औरंगाबाद मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ साहित्य संमेलनाचे  उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपालांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.

Share