राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर, सुळेंकडून पवारांचा तो व्हिडीओ ट्विट…

मुंबईः  राज्यापाल भगतसिंह कोश्यारी काल औरंगाबाद दौऱ्यावर असताना समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असे वक्तव्य एका कार्यक्रमात केले आहे. या वक्तव्या वरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असुन पुणे येथे त्यांच आंदोलन सुरू आहे. तसेच राज्पालनंच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सु्ळे यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्विट करत राज्यपालांना उत्तर आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी शरद स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजामाता होत्या, असं सांगणारा शरद पवारांचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून राजामाता जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे गुरु कोण? हा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती, त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले. असं शरद पवार या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी एकूण पाच ट्विट केले आहेत. व्हिडीओ आणि कोर्टाच्या निर्णयाची कॉपीही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि.  १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ असे सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रे पोस्ट करत म्हटले आहे.

काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी 
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.” औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

Share