किसान ड्रोन्सचा शेतीमध्ये केला जाणार वापर- निर्मला सीतारमन

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सीतारमन यांनी केलेल्या इतर अनेक घोषणांसोबत देशात पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. शेतकरी ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाणार असल्याची घोषणा सीतारमन यांनी केला.

 

 किसान ड्रोन्सचा वापर  शेती मध्ये केला जाणार

देशातील कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरलं जाणार असल्याची घोषणा केली. किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. हे कृषी ड्रोन्स पिकांची पहाणी करणे, जमीनीच्या नोंदी ठेवणे तसेच किटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरले जाणारे आहेत. कृषी आणि पिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे, असं अर्थमंत्री म्हणाल्यात.

शेती क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले. तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. देशातील ९ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी नवीन योजना राबविणार आहे. आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर सरकारकडून धान्याची खरेदी करण्यात आली आहे. त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जातात, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार शेतकऱ्यांना पिकावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार आहे. तसेच नैसर्गीक शेतीसाठी, झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देणार, त्याचे नियोजन करण्यासाठी योजना राबविणार. ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे.  कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करणा्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच  २५  हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी २० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Share