गेल्या काही भारतातील अनेक राज्ये उष्णतेची लाट आणि वाढत्या तापमानाचा सामना करत आहेत. राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, दिल्लीत पारा ४६ अंशांच्या पुढे गेला आहे. येत्या काही दिवसांतही उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आता तापमानाचा वाढता आलेख सर्वसामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत सर्वांचीच चिंता वाढवत आहे.
पश्चिम राजस्थानमध्ये ३० एप्रिल रोजी उष्णतेची लाट आणि १ मे रोजी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील पाच दिवस विदर्भ, मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा-चंडीगड-दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि तेलंगणामध्ये चार दिवसांत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
काळजी करण्याची तीन कारणे:
उच्च तापमान: ७२ वर्षांनंतर केवळ दुसऱ्यांदाच दिल्लीत एप्रिल महिन्यात एवढी उष्णता आहे. येथे सरासरी मासिक कमाल तापमान ४०.२अंश सेल्सिअस होते. नवी दिल्लीत गेल्या ६आठवड्यांतील सरासरी तापमान सामान्यपेक्षा ४ अंशांनी जास्त होते. शुक्रवारी राजस्थानमध्ये ४६.५ अंश सेल्सिअस तापमान होते. १मे रोजी जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात कमाल तापमान ४५आणि ४७ अंश सेल्सिअस राहील.
उष्णतेची लाट: हवामान तज्ञ म्हणतात की तीव्र उष्णतेच्या लाटेचा कालावधी उच्च तापमानापेक्षा अधिक चिंतेचे कारण आहे. बर्कले अर्थचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट रोडे यांनीही भारत/पाकिस्तान उष्णतेच्या लाटेच्या कालावधीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
आरोग्य: मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर कोविडच्या चौथ्या लाटेपेक्षा उष्णतेच्या लाटेबद्दल अधिक चिंतित आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अहमदाबाद मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्षा मोना देसाई म्हणाल्या, “आम्हाला असे अनेक रुग्ण मिळत आहेत ज्यांना उष्माघातासंबंधी इतर समस्या आहेत.” हवामान खात्यानेही प्रभावित भागातील लोकांना उष्णतेपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
उष्णतेची लाट कोरोना लाटेपेक्षाही भयानक