२२ हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंपनी विरूध्द गुन्हा दाखल

गुजरात- २२,८४२ कोटींची फसणूक केल्या प्रकरणी गुजरात येथील एबीजी शिपयार्ड कंपनी विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखस केला आहे. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अगरवाल यांच्यासह आठ जणांन विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घोटाळय़ाच्या संबंधात बँकेने सर्वप्रथम ८ नोव्हेंबर २०१९ रोजी तक्रार नोंदवली होती व सीबीआयने त्याबाबत १२ मार्च २०२० ला काही स्पष्टीकरण विचारले होते. यानंतर त्याच वर्षी ऑगस्टमध्ये बँकेने नव्याने तक्रार नोंदवली. तिची सुमारे दीड वर्षे पडताळणी केल्यानंतर सीबीआयने कारवाई करत ७ फेब्रुवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

या कंपनीला २८ बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्जाची सुविधा मंजूर करण्यात आली होती व त्यापैकी स्टेट बँकेचा वाटा २४६८.५१ कोटी रुपयांचा होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले . २०१२ ते २०१७ या कालावधीत आरोपींनी मिळून संगनमत केले आणि निधी इतरत्र वळवणे, त्याचा गैरवापर करणे आणि फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात यांसह इतर बेकायदेशीर कामे केली आहेत, असेही अधिकारी म्हणाले. सीबीआयने नोंदवलेले बँक घोटाळय़ाचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे .

Share