डिजिटल सदस्य नोंदणीतून काँग्रेस व्याप्ती वाढवा – पटोले

मुंबई : काॅँग्रेसने हाती घेतलेल्या डिजिटल सदस्य नाेंदणी अभियानाचे काम महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने सुरु आहे. देशाचे संविधान धोक्या असून संविधान वाचवण्याच्या लढ्यात काॅँग्रेसला मोठी भूमिका बजावायची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात डिजिटल सदस्य नोंदणी करुन काॅँग्रेस पक्ष संघटन मजबूत करा असे आव्हान माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनी केले.
काँग्रेसचे मुख्यालय, टिळक भवन येथे डिजिटल सदस्य नोंदणी अभियानासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री, प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू व प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
https://twitter.com/NANA_PATOLE/status/1492507825364692992?s=20&t=H9InVz9d1BZyT-i24CGWew
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशात काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच महत्वाची राहिलेली आहे. सध्या देशाचा कारभार कशा पद्धतीने सुरु आहे ते आपण सर्वजण पहातच आहोत. देश सध्या मोठ्या संकटातून जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन देश उभा करण्यात मोलाची कामगिरी काँग्रेसने बजावली आहे. आताही देश, लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याची गरज आहे. डिजिटल सदस्य नोंदणी अभियान सर्व नेते, पदाधिकारी यांच्या सक्रीय सहभागाने दिलेले लक्ष्य आपण वेळेत पूर्ण करु. घराघरात जावून काँग्रेस पक्षाची व्याप्ती वाढवण्याची संधी असून आपण सर्वजण यात यशस्वी होऊ, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
Share