अखेर शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची संभाव्य यादी निश्चित…

मुंबई : शिंदे फडणवीस सरकार येऊन एक महिना लोटला. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जातेय. अशावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक महत्वाची बातमी समोर आली असून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली असून, यामध्ये भाजपचे ८ आणि शिंदे गटाचे ७ मंत्री पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्या टप्प्याच वरिष्ठ आमदारचं शपथ घेतील असे सांगितले जात आहे.

शिंदे गटातील कुणाची लॉटरी लागणार?

गुलाबराव पाटील

उदय सामंत

दादा भुसे

शंभूराज देसाई

अब्दुल सत्तार

दीपक केसरकर

संदीपान भुमरे

संजय शिरसाट

भाजपकडून कुणाला संधी मिळणार?

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन

राधाकृष्ण विखे पाटील

बबनराव लोणीकर

प्रवीण दरेकर

रविंद्र चव्हाण

नितेश राणे

एकीकडे, राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन होईन महिना झाला तरी मंत्र्यांचा शपथविधी अद्याप झालेला नाही. त्यात शिवसेना आणि बंडखोरांमधील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दुसऱ्या दिवशी सुरू झाली आहे. अद्यापपर्यंत न्यायालयाने या सर्व प्रकरणावर अद्याप निकाल न आल्यामुळेदेखील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात अडचणी असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय भाजपमधील कुरघोड्यांच्या राजकारणामुळेही विस्तार रखडल्याची चर्चा असताना काही दिवसांपूर्वी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते. या सर्वांमध्ये आता गेल्या महिनाभरापासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Share