राज्यातील सरकार म्हणजे ‘एक दूजे के लिए’ असे दोघांचेच सरकार -सुप्रिया सुळे

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आत महिना पूर्ण झाला तरीही खातेवाटप होत नाही. यावर राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील सरकार हे ‘एक दुजे के लिए’ असे दोघांचेच सरकार असल्याची खोचक टीका केली आहे. राज्यात पावसामुळे ओला दुष्काळ पडला असताना जिल्ह्यात पालकमंत्री नाहीत, प्रशासनाला निर्णय कोण घेत आहे हे माहिती नाही, जिथे मदतीची गरज आहे तिथे मंत्रीच उपलब्ध नाहीत, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा देशात आर्थिक मंदी येणार नाही हा दावा हास्यास्पद आहे, असा शेरा सुप्रियाताईंनी मारला. देशात आर्थिक मंदी सर्वत्र दिसत आहे, त्यामुळे केवळ सरकारच्या विरोधात टीका करण्यासाठी आम्ही बोलत नसून यातून ठोस मार्ग काढायला हवा, अशी काल लोकसभेत झालेल्या चर्चेमागील आमची भूमिका होती. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारावी हाच आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की,  संजय राऊत यांच्या आधी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावरही ईडी कारवाई करण्यात आली आहे. या तीनही केसमध्ये एक साम्य आहे की त्यांची मुलं याविरोधात ज्यापद्धतीने लढत आहेत त्याचा मला सार्थ अभिमान आहे. यात दूध का दूध आणि पानी का पानी निश्चित होईल, असही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Share