अखेर युद्धला सुरूवात ; रशियाचे युक्रेनवर मिसाइल हल्ले

आंतरराष्ट्रीय- युक्रेन आणि रशियातील वादला आता युध्दाचे स्वरूप आले आहे. दोन्ही देशात युध्दाला सुरुवात झाली आहे. कीवच्या क्रूज आणि बॅलेस्टिकवर मिसाइलनं हल्ला करण्यात आल्याचं समोर येत आहे. कीवशिवाय इतर शहरांमध्येही स्फोट झाले आहेत. गुरुवारी सकाळी डोनेट्स्कमध्ये ५ स्फोट झाले. डोनेस्तकला रशियानं स्वतंत्र्य देशासाठी मान्यता दिली होती. यूक्रेनवर लष्करी कारवाई करण्याच्या पुतिन यांच्या आदेशानंतर आता युद्ध सुरु झालं आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, युक्रेन-रशिया युद्ध टाळता येण शक्य नाही. त्यासाठी रशिया स्पेशल मिलिट्री ऑपरेशन लॉन्च करत आहे. युक्रेनच्या सैन्यांनी शस्त्र खाली टाकावीत आणि शरण यावं. त्याचसोबत जो कुणी आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अथवा आमच्या सैन्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यांनी लक्षात ठेवावं की रशिया त्याचं तातडीनं चोख उत्तर देईल. तुम्ही तुमच्या इतिहासात कधी अनुभवलं नसेल असे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच पुतिन यांनी दिला आहे.

Share