नवाब मलिकांच्या मुलीचा ईडीवर गंभीर आरोप

 मुंबई :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीच्या व्यवहार प्रकरणी करण्यात अटक करण्यात आली आहे. याबाबद त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आले आहे. यानंतर या सर्व प्रकरणाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत . मलिकांच्या अटकेनंतर महावीकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला. दरम्यान, नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. मलिकांची मुलगी निलोफर मलिक यांनी ईडीच्या रिमांड कॉपीत मलिकांबाबत चुकीची माहिती असल्याचा गंभीर आरोप ईडीवर केला आहे.

 

काय आहेत निलोफरांचे आरोप?
मलिकांची मुलगी निलोफर मलिक-खान म्हणाल्या की, भाजपाकडून मुद्दाम त्रास दिला जातोय. मागील काही दिवस खूप चर्चा होती की ईडीकडून आम्हाला त्रास होणार. आणि शेवटी नवाब मलिक यांना ही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि तिथे अटक केली. मात्र ईडीच्या रिमांड कॉपीत नवाब मलिकांना यात महसूल मंत्री म्हटले आहे. केंद्रीय यंत्रणेकडून चुकीची आणि खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप निलोफर यांनी केलाय. निलोफर पुढे म्हणाल्या, आम्ही जमीन खरेदी केली पण त्यात ज्या पद्धतीने चित्र निर्माण केले जे चुकीचे आहे, यावर लवकरच कागदपत्र दाखवू. अटक करण्यापूर्वी माझ्या कुटुंबियांसोबत पोलिसांनी चर्चा केली नाही. ईडी अधिकारी थेट मलिक यांना घेऊन गेले. केंद्रीय यंत्रणांचा पर्दाफाश माझे वडिल करत होते, त्यामुळे मी सुद्धा मुलगी म्हणून वडिलांची साथ देऊन यामागील सत्य लवकरच समोर आणेल. प्रत्येक मुस्लीम अंडरवर्ल्डशी जोडलेला असतो का? कोर्टात ईडी खोटे आणि चुकीचे आरोप करते. पण त्यांच्याकडे पुरावे नाहीत. पण लवकरच सत्य समोर येईल असे निलोफर म्हणाल्या.

Share