भारतीय इतिहासातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची आज १९५ वी जयंती आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘फुले’ असे या चित्रपटाचे नाव असून यात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुलेंची तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाईंची भूमिका साकारत आहे. ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी दिलेले योगदान, दलित, वंचित आणि महिलांसाठी केलेले कार्य या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन करणार आहेत. आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/reel/CcNqITCgNxM/?igshid=YmMyMTA2M2Y=
चित्रपटाचे पोस्टर प्रतीक गांधीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. महात्मा फुलेंवर आधारित हा हिंदी बायोपिक 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम १९९२’ या वेब सिरिजमुळे प्रतिक गांधीला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. तो अलीकडेच ‘द ग्रेड इंडियन मर्डर’ या वेब सिरिजमध्ये दिसला होता. तर अभिनेत्री पत्रलेखाने अभिनेता राजकुमार रावसोबत ‘सिटीलाइट्स’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१८ मध्ये ती ‘नानू की जानू’मध्ये दिसली होती. अलीकडेच पत्रलेखा अभिनेता राजकुमार रावसोबत विवाहबद्ध झाली.