चेन्नई सुपर किंगला आणखी एक धक्का

चेन्नई सुपर किंगचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहरच्या पाठीत दुखपत झाल्याने तो या संपूर्ण सीजन मधून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी २० आय मालिकेदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती.

दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरू येथे झालेल्या मेगा लिलावात 14 कोटींची मोठी बोली लावून विकत घेतले. दीपक गेल्या सीझनपर्यंत चेन्नईचा भाग होता, पण फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. यानंतर, दीपक पुन्हा मेगा लिलावात मोठी बोली लावून संघात सामील झाला. चेन्नईला त्यांचा स्टार गोलंदाज दीपक चहरची खूप उणीव भासणार आहे.

दीपक चहर सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. दीपकचे वडील आणि प्रशिक्षक लोकेंद्र सिंह चाहर यांनी सांगितले की, दीपकशी सतत फोनवर चर्चा होत असते. त्याच्या फिटनेसची चर्चा आहे. दीपकने सांगितले की तो खूप मेहनत करत आहे. त्याच्या दुखापतीत आधीच बरीच सुधारणा झाली आहे.

दीपक मैदानात कधी परतणार हे मी ठरवू शकत नाही, असे प्रशिक्षकाचे म्हणणे आहे. खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे की, नाही हे NCA ठरवते. दीपक पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच मैदानात परतणार आहे. मात्र, दीपकला संघात घेतल्यास चेन्नईला खूप फायदा झाला असता, असे ते म्हणाले.

दीपकची खासियत म्हणजे तो सुरुवातीलाच विकेट घेतो. त्यामुळे विरोधी संघावर दबाव येतो. लोकेंद्र यांनीही आपला पुतण्या राहुल चाहरच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. राहुल चांगली गोलंदाजी करत असल्याचे ते म्हणाले. चेन्नईविरुद्ध राहुलने 25 धावा देऊन तीन बळी घेतले. यापुढील काळातही राहुल चांगली कामगिरी करत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Share