आधी कॉंग्रेस मुक्त भाषण तर करून दाखवा – यशोमती ठाकुर

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना कार्ड वापरत काॅग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. युपी, महाराष्ट्र, पंजाबमध्ये काॅग्रेसमुळे कोरोना वाढल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या या विधानावरुन काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपला जोरदार प्रत्यूत्तर दिलं आहे.

यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, आधी कॉंग्रेस मुक्त भाषण तर करून दाखवा असा टोला यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत भाषण केलं. या भाषणावर विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण करत काँग्रेसवर पलटवार केला. तसंच कोरोनाच्या महामारी वाढण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा थेट आरोपच मोदींनी केला.

Share