श्रीवल्ली गाण्यावर आधी वॉर्नर…आता रैनाचा डान्स व्हायरल !

मंनोरजन : काही दिवसांपूर्वी सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-द राइज‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच चित्रपटाचे डायलाॅग आणि गाण सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असल्याचे दिसत आहेत. पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे युवकांनसह क्रिकेटपटुंना  देखील आवडले आहे. या गाण्यात अल्लू अर्जुनने केलेली हुक स्टेपही सर्वांच्या पसंतीत पडली आहे.

https://www.instagram.com/reel/CZCoUjXoPjQ/?utm_source=ig_web_copy_link

 

ऑस्ट्रलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा या गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आजा टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने या गाण्याचा ठेका धरत, डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याच्या बरोबर कुटूंबातील दोन सदस्यही व्हिडिओमध्ये दिसताय. व्हिडिओ पोस्ट करत रैनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी हे गाणे करण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. अल्लू अर्जुन भाई, पुष्पा चित्रपटात तुम्ही किती छान काम केले आहे. मी तुम्हाला यशासाठी खूप शुभेच्छा देतो.’ अल्लू अर्जुननेही सुरेश रैनाचा हा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट करताना ‘ग्रेट’ असे लिहिले आहे.

Share