३०० युनिट पर्यंत वीज मोफत, ‘या’ राज्यातील सरकारचा मोठा निर्णय

पंजाब : पंजाबमध्ये घरगुती ग्राहकांना १ जुलैपासून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी यासंदर्भात घोषणा केली आहे. आप ने निवडणूक जाहीरनाम्यात मोफत विजेचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही घोषणा करण्यात आली आहे.

मोफत वीज वापरासाठी एक अट आहे. दोन महिन्यांत ६०० युनिटपेक्षा अधिक वापर झाला तर ग्राहकाला पूर्ण बिल भरावे लागेल. तथापि, अनुसूचित जाती, मागास वर्ग, बीपीएल कुटुंबे आणि स्वातंत्र्यसैनिकांना ६०० युनिटपेक्षा जास्त वापराचेच बिल भरावे लागेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ५ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. सूत्रांनी सांगितले की, मान यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेतली होती. दोघांत ३०० युनिट मोफत वीज देण्यावर चर्चा झाली होती.

Share