औरंगाबाद : दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. अखेर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे. एकीकडे या घडामोडी सुरू असताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, दसरा मेळाव्याबाबत आमच्या तरुण कार्यकत्यांनी राज ठाकरेंनी हा मेळावा घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर राज ठाकरेंना मी विनंती केली होती. तेव्हा वर्षानुवर्षे दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे आणि यात समीकरणात आपण जाण हे कोठेपणाचं लक्षण ठरेल. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मी फारसा उत्सुक नाही असं राजसाहेबांनी म्हटल असे त्यांनी सांगितले.
तसेच दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कचं राजकारण करणं हे कोतेपणाचं ठरेल असं राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना सांगितले होते. राज ठाकरेंनी दिलेला सल्ला किती योग्य होता आणि राज ठाकरेंसोबत बाळासाहेबांच नातं हे दिसून येते. दसरा मेळावा उद्धव ठाकरेंनी आनंदाने घ्यावा. विनाकारण मनसेला टीकेचे लक्ष्य केले जाते हे करू नका असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.