मुंबईः पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील बदलांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात येत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या १४ दिवसांमध्ये आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत बारावी वाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका देत सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. अशातच महाराष्ट्रासह मुंबईच्या सर्व शहरांमध्ये आजही इंधनाच्या किमती कडाडल्या आहेत.
शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई ११८.८३ रुपये १०३.०७ रुपये
पुणे ११८.४१ रुपये १०१.१३ रुपये
नाशिक ११८.९५ रुपये १०१.६५ रुपये
परभणी १२०.३६ रुपये १०३.०२ रुपये
औरंगाबाद ११९.५५ रुपये १०२.२३ रुपये
कोल्हापूर ११८.७४ रुपये १०१.४७ रुपये
नागपूर ११८.४९ रुपये १०१.२४ रुपये