मुंबई : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या अडीच महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. २१ मे रोजी केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर २२ मे ला पेट्रोलचे दर ९.५० रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ६ रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून ते आतापर्यंत इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेचे दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज मुंबईत पेट्रोलचा दर १०६.२५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९४.२२ रुपये प्रति लिटर आहे. तसेच, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५ रुपये तर डिझेलचा दर ९२ रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.७४ रुपये तर डिझेलचा दर ९३.२३ रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.२३ रुपये तर डिझेलचा दर ९२.५८ रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.