कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी दरवर्षी वेगळी घोषणा करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले आहे. अशा अनेक अनाथ मुला-मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी सरकारने संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पदवी आणि पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची फी सरकार भरणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

Share