गँगस्टर गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : आगामी  पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती लागल्याचं चित्र आहे. पुण्यातील कुख्यात डॉन गजा मारणे याची पत्नी मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश  प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत जयश्री मारणे यांनी प्रवेश केला आहे.

जयश्री मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका आहेत. त्या महापालिकेच्या २०१२ सालच्या निवडणुकीत कोथरूडमधून निवडून आल्या होत्या. गजा मारणे हा ‘मकोका’च्या गुन्ह्यात यापूर्वी अटक होता. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे. निवडणुकांचा कालावधी जवळ आला की गँगस्टरला सुगीचे दिवस येत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मोहोळ याने आपल्या पत्नीच्या रुपाने महापालिकेच्या सत्तावर्तुळात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

कोण आहे गजानन मारणे?

कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. काही दिवसांपासून तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढली होती. कुख्यात गुंड गजानन मारणेची २ जणांच्या खून खटल्यातून मुक्तता  झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी ‘महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस’ टाकत त्यांची एक्स्प्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात ३०० हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात २०१४ मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते.

Share