रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खा ड्रॅगन फळ

ड्रॅगन फळ हे शरीरासाठी खुप लाभदायक आहे. ड्रॅगन फळ हे द्राक्षवेलीवरचे एक फळ आहे. ड्रॅगन फळाचे स्टेम्स मांसल आणि रसाळ असतात. हे फळ दोन प्रकारचे असते. एका प्रकारच्या फळात पांढरा आणि दुसऱ्या प्रकारच्या फळामध्ये लाल रंगाचा रसाळ भाग असतो. ड्रॅगन फळ औषध म्हणून देखील वापरले जाते. ड्रॅगन फळामध्ये बरीच पोषक तत्त्वे असतात. त्यात फायबर, अँटीऑक्सिडेंट्स, खनिज आणि जीवनसत्त्वे यासारखे पोषक असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

ड्रॅगन फळाचे आरोग्यदायी फायदे:

एकदम भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच ९०% पाणी असते. बाहेरुन जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो आणि त्यात किवी सारख्या बिया असतात. त्या खाल्यातरी चालतात.

हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे असे म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे विटामिन सी चे भरपूर कोठार. विटामीन सी असले की रोग प्रतीकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही.

ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य ही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाण्याने तुम्ही तरुण रसरसलेले दिसतात.

ह्याच्यामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. साहिजकच एकदा पोट साफ असले की ९०% व्याधी नाहीशा होतात. म्हणजेच रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी राहते. म्हणजे डायिबटीस धोका टळला. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका रहात नाही. तसेच ह्यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकार सर्वावर मात करता येते.

ह्या फळांमधील अंँटीऑक्सिडंट आणि विकरे केसांचे सौन्दर्य खुलविते. ह्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. ह्यातील लोह रक्ताचे हेमोग्लोबिन वाढवते आणि एनिमेया होऊ देत नाही.

खरे पाहता हे आंबट फळ आहे तरी ह्यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. तसेच ह्याच्यामुळे दात व हाडे मजबूत होतात. डेंग्यू झाल्यावर आपले हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. पण ह्या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तयच बरोबर हाडे पण मजबूत होतात. तेव्हा डेंग्यू ची भीती हि कमी होईल.

अतिशय महत्त्वाचे म्हणजे हे फळ कन्सर ला अटकाव करते. कारण कि फळामध्ये लायाकोपेन नावाचे विकर असते. ते विटामीन सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते. ह्या फ्ल्याच्य सालीत पण पॉलीफेनोल आणि रसायने असतात जे कि काही विशिष्ट कॅन्सर पासून संरक्षण करते.
रक्ताल्पता असलेल्या एनिमिक गर्भवतीनां रक्तातील होमोग्लोबिन कमी होते आणि बाळाला कमी होमोग्लोबिनची मात्र कमी पडते. ह्या फळाच्या सेवनाने गर्भवती चे होमोग्लोबिन वाढते.

माणसाचे जे जे मोठे शत्रू रोग आहेत त्या त्या सर्वांचा हे फळ नाश करते. रोगप्रतिकार शक्ती पासून ते कॅन्सरविरोधी शक्ती पर्यंत हि शक्ती निरोगी बनवते.

सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे, लठ्ठपणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे ह्या गाळाचे सेवन केल्यास लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत होते.

Share