‘गंगूबाई काठियावाडी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

मुंबईः  संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी चित्रपट काल प्रदर्शित झाला. बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोट्यावधींची कमाई केली आहे.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. आलियासोबत शांतनु महेश्वरी आणि अजय देवगण यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

https://www.instagram.com/p/CaHY06uPS1d/?utm_source=ig_web_copy_link

बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ९.५०-१० कोटी रूपये आहे. रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या रणवीर सिंहच्या ८३ या चित्रपटापेक्षा गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकेंडला या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले होईल, असे म्हटले जात आहे.

 

 

Share