गंगूबाई काठियावाडी चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रक्षेकांच्या भेटीस

मुंबईः दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात गंगूबाई यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसा पूर्वी रिलीज झाल आहे. बऱ्याच काळापासून या चित्रपटाचे प्रदर्शन कोरोनामुळे रखडले होते. पण येत्या २५ फेब्रुवारीला आता हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. हा चित्रपट याआधी ११ सप्टेंबर २०२१ ला रिलीज होणार होता, पण कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या ३ मिनिटे १५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अभिनय पाहाण्यासारखा आहे. आलियाची दमदार चाल, तिचा भारदस्त आवाज आणि करडी नजर यावरुन तिने भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. कामाठीपुरा येथील वेश्या व्यवसायात दबदबा असलेल्या गंगूबाईचा संघर्षमय प्रवास ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या मुलांच्या हक्कासाठी लढताना गंगूबाई दाखवण्यात आली आहे.

चित्रपटात मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तेथील माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. अजय देवगण या चित्रपटात करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

Share