प्रेमाची अनोखी केमिस्ट्री ‘वन फोर थ्री’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबईः व्हॅलेंटाईन डे चा औचित्य साधून दिग्दर्शक योगेश भोसले ‘वन फोर थ्री’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल आहे. प्रत्येक प्रेमी युवक युवती या ट्रेलरला त्यांच्या व्हॅलेंटाईनला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी डेडिकेट करू शकेल असा हा ट्रेलर आहे. वन फोर थ्री हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत्या ४ मार्चा येत आहे.
https://www.kooapp.com/koo/taran_adarsh/c31d927e-279a-4dc1-a900-1e6b19d0f7e2

‘वन फोर थ्री’ चित्रपटाची चर्चा सध्या मनोरंजनविश्वात रंगलेली तर आहेच, त्यात या उत्कंठावर्धक आणि लव्हेबल ट्रेलरने दणक्यात केलेल्या एन्ट्रीने रसिकांची उत्सुकता अधिकच ताणून धरली जाणार आहे. ‘हे आपले काळीज हाय’, ‘करेन तर मामाचीच’ या टॅगलाईन सध्या सोशल मीडियावर गाजल्या आहेत. नेमक्या या टॅगलाईन काय आहेत, हे नुकतेच चित्रपटाच्या ट्रेलरमधून उघडकीस आले आहे.

 

वन फोर थ्री’ चित्रपट हा दाक्षिणात्य धाटणीचा असून रिअल लाईफ स्टोरीवर आधारित आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत प्रेमीयुगुलांसाठी पर्वणीच ठरला आहे. या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांची रोमँटिक जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत असून खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर विशू आणि मधुची लव्हस्टोरी पूर्ण होईल का? एकमेकांसाठी बनलेल्या विशू आणि मधूला त्यांचे प्रेम एकत्र ठेवेल का? मधू आणि विशूच्या प्रेमात अनंता अडथळा आणेल का? असे अनेक प्रश्न पडले असतील. मात्र, या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळतील. हा चित्रपट ४ मार्चला रिलीज होणार आहे.

Share