खुशखबर..! केरळात मान्सून दाखल, लवकरच महाराष्ट्रातही धडकणार

मुंबई : उन्हाने त्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून वेळेआधीच केरळात दाखल झाला आहे. हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. ५ जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होऊ शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. २७ जून पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण त्यापेक्षा आधी मान्सूनचे आगमन झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

केरळात मान्सून दाखल झाल्यावर सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. महाराष्ट्रातील तळकोकणात पहिल्यांदा मान्सून दाखल होत असतो. त्यानंतर तीन ते चार दिवसांत मुंबईमध्ये मान्सून दाखल होत असतो. १० ते ११ जूनच्या सुमारास साधारण मुंबई आणि पुण्यात दाखल होत असतो. पण यावर्षी ७ ते ८ जूनला पुण्यात आणि मुंबईत मान्सून दाखल होईल. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी देखील केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची दिली आहे. मान्सून केरळमधील कन्नूर, पालकड आणि मदूराईमध्ये दाखल झाल्याचं म्हटलं आहे. त्या ठिकाणी पाऊस सुरु आहे. दुसरीकडे मान्सून भारतात दाखल होत असताना शेतकऱ्यांकडून देखील खरिपपूर्व कामांना वेग देण्यात येत आहे.

Share