शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार ३ टक्के महागाई भत्ता

मुंबई : राज्य सरकारमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. यानुसार आता राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव ३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे आता महागाईभत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे.

दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. गणपती उत्सवापूर्वी खात्यात पैसे जमा झाल्यानं कर्मचारी आनंदात आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ४ टक्के वाढ केलीय. महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते जमा केले आहेत. आता सरकार तिसरा हप्ता खात्यावर पाठवत आहे.

Share