मुंबई- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी ईडीने पहाटे छापा टाकत त्यांना ईडी कार्यलयात चौकशीसाठी नेण्यात आल्याचे वृत्त एएनआयने प्रसिध्द केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी मलिक यांनी सरकारी पाहूण्यांचा उल्लेख केला होता.
NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrives at the office of the Enforcement Directorate in Mumbai. Details awaited.
(File photo) pic.twitter.com/vYMmvovKsQ
— ANI (@ANI) February 23, 2022
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झालं . त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.