स्त्रीयांसाठी शहागंज येथे शासकीय रुग्णालय उभारावे-खासदार

औरंगाबाद :  खासदार इम्तियाज जलील यांनी शहागंज येथील दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारण्याची मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.  घाटीचे अधिष्ठाता वर्षा रोटे कागीनाळकर यांना प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे पत्राव्दारे कळविले आहे.

मुख्य बाजारपेठ, नागरी वसाहतीचा मध्यभाग असलेल्या शहागंज येथे अशा रुग्णालयाची आवश्यकता आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे येथे फक्त ओपीडी सुरु असून गरीबांचे प्रमथोमचार केले जातात. मात्र महिलांवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना घाटी येथे रेफर केले जाते त्यामुळे त्यांची गैरसोय होवू नये यासाठी येथे  रुग्णालय असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. असे खासदार जलील यांनी म्हंटले आहे.

Share