पुण्यातील शाळांना पालकमंत्र्यांकडून हिरवा कंदील

पुणे- पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील शाळांना हिरवा कंदील दाखवत १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याच म्हंटलं आहे. राज्यातील शाळा १९ जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेऊन शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, रुग्णसंख्येत घट होत असताना पुण्यातील शाळा-महाविद्यालयांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यासंदर्भात येत्या १ फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. मात्र, पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग फक्त चार तास भरतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काय असेल नियमावली?

  • शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार
  • शाळेची वेळ फक्त चार तास – विद्यार्थ्यांनी नाश्ता करून यायचं, आणि त्यानंतर जेवण घरी जाऊन करायचं
  • मास्क काढायला लागेल अशा अॅक्टिव्हिटी टाळणार
  • पालकांनी विद्यार्थ्यांना मास्कचं बंधन करावं
  • ९वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू
  • ८वी पर्यंतच्या शाळा चार तास भरवल्या जाणार
  • ५० टक्के क्षमतेने शाळा सुरू होणार
  • रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाइज करण्यात याव्या
Share