मोदी सरकारने अडाणी व अकार्यक्षम अधिकारी नेमले आहेत का?

मुंबई :  नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा.राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. आता पुन्हा एकदा ईडीने शुक्रवारी राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यावरून आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर जोरदार टिका केली आहे.

राहुल गांधी यांना शुक्रवारी चौथ्या वेळी ED ने चौकशीला बोलवले आहे. मोदी सरकारने चौकशी करता येत नाही असे अडाणी व अकार्यक्षम अधिकारी नेमले आहेत का? मोदी सरकारच्या सूडाग्नीच्या ज्वाला शमत नाहीत हे स्पष्ट आहे. जगात अनेक शासकांनी अत्याचार केले पण लक्षात ठेवा ती साम्राज्ये टिकली नाहीत. अशी टीका सचिन सावंत यांनी ट्विटर द्वारे केली आहे.

 

दरम्यान राहुल गांधींवरील कारवाईवरून कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत देशभर मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र भाजपने याला केंद्रीय यंत्रणेवर दबाव टाकण्यासाठी काँग्रेसची ही नीती असल्याची टीका केली आहे. त्यामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे.

Share