HBD Virat Kohli: विराटच्या वाढदिवशी अनुष्काने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाली…

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आज ३४ वा वाढदिवस  साजरा करत आहे. विराटला वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहे. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्कानं विराटचे काही अतरंगी फोटो शेअर केले आहेत.

अनुष्का शर्मानं विराट कोहलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहलं आहे की, ‘आज तुझा वाढदिवस आहे. त्यामुळे पोस्ट करण्यासाठी मी काही बेस्ट अँगलमधील फोटो निवडले आहेत. प्रत्येक स्टेट, फॉर्म आणि वेमध्ये मी तुझ्यावर प्रेम करत राहिल’.

अनुष्का शर्मानं शेअर केलेल्या पोस्टाला विराट कोहलीनं कमेंट केली. त्यानं कमेंटमध्ये लाफ्टर इमोजी आणि हार्ट इमोजीचा वापर केला आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी अनुष्काच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Share