अंजिर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आजकाल धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला काहीना काही त्रास, दुखणं सतावत असते. दिवसभर कम्युटर, लॅपटॉपसमोर बसल्याने, चूकीच्या पद्धतीने आहारात पदार्थांचा समावेश केल्याने, अपुर्याट झोपेमुळे कंबरेचे, पायाचे दुखणे वाढते. तुमच्या आहाराकडे थोडं लक्ष दिल्यास अनेक दुखण्यांपासून आराम मिळू शकतो. आजकाल लहानमोठी दुखणी आबालवृद्धांमध्ये आढळतात. मग अशा दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात अंजीरचा समावेश करणं फायदेशीर आहे. प्रामुख्यने सुके अंजीर खाल्ल्यास ते आरोग्याला फायदेशीर आहे.

यापारी दृष्टी्ने अंजीराची लागवड फकत महाराष्ट्रा्तच केली जाते. महाराष्ट्रात सातारा व पूणे जिल्हजयाच्याे शिवेवरील नीरा नदीच्या् खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) दहा-बारा गावांचा परिसर हा अंजीर उत्पाीदनाचा प्रमुख भाग आहे.
औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्ण खानदेश जिल्हदयात या फळझाडाची थोडीफार लागवड होते. अंजीर हे कमी पाण्यादवर येणारे काटक फळझाड आहे. अलिकडे सोलापूर-उस्माकनाबाद येथे (अंजीराची) लागवड शेतकरी करू लागले आहेत. त्यालवरुन अंजीर हे सर्व दुष्काेळी भागात उत्तआम होईल असे म्ह णायला हरकत नाही. या अंजीर व्यापारीदृष्ट्या जसे चांगले आहे, तसेच याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होत असतो.

काय आहेत अंजीर खाण्याचे फायदे….
• अंजीरामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो आणि शौचास साफ होते.
• शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेल्या अंजीराचे दोन भागात विभाजन करून त्यामध्ये गूळ भरून ठेवावा. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर चूळ भरून खावे. असे नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतेच व उष्णताही कमी होते.
• अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो.
• अंजीर पित्त विकार, रक्तविकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे.
• ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात.
• कच्च्या अंजीराची जीरे, मोहरी, कोथिंबीर घालून भाजी करावी. यामुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्व व लोह यांचे प्रमाण प्राकृत राहते.
• पिकलेल्या अंजीराचा मुरंबा करून वर्षभर खावा. हा मुरंबा दाहनाशक, पित्तनाशक आणि रक्तवर्धक असतो.

Share