चिंच म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबड-गोड चिंचेचा वापर चटणी, सॉस बनवताना केला जातो. इतकंच नव्हे तर दाक्षिणात्य पद्धतीची डाळ बनवताना किंवा ठराविक मिठाईचे पदार्थ बनवतानाही चिंचेचा वापर केला जातो. चिंचेच्या वापराने पदार्थाला एक वेगळीच चव प्राप्त होते. दैनंदिन खाद्यपदार्थात चिंचेचा वापर केल्यास त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत.
चिंच खाण्याचे फायदे
- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
ज्याना वजन कमी करायची इच्छा आहे त्यानी थोड्या प्रमाणात चिंचेचे सेवन करा. चिंचेमुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यासाठी चिंचेच्या बियांचा वापर फायदेशीर ठरू शकतो. चिंचेच्या बियांमध्ये ट्रिप्सिन आढळते. जे वजन कमी करण्यास मदत करते. - पचन प्रक्रियेत चिंचेचे फायदे
चिंचेमध्ये व्हिटामिन बी, सी, कॅरोटिन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात. चिंचेचे सेवन केल्यास अन्न योग्य पचन होते. म्हणून ज्याना जेवण व्यवस्थित पचत नाही त्यांनी दररोज थोडी चिंच खा. चिंच खाल्ल्याने पाचन शक्ती मजबूत होते आणि पाचक प्रणाली योग्य प्रकारे कार्य करते. - हृदयासाठी चिंचेचे फायदे
चिंच हृदयासाठी फायदेशीर आहे. कोरोनरी हार्ट डिसिज म्हणजे हृदयरोगांसाठी फ्री रॅडिकल्स
देखील जबाबदार मानले जातात. चिंच फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून हृदयाचे रक्षण करू शकते. जमल्यास आठवड्यातून एकदा तरी चिंच खा. - इम्युनिटी वाढवते चिंच
चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती सुधरवण्यासाठी मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास अनेक आजारांचा धोका असतो. चिंच खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधरवण्यासाठी मदत होईल. - चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी, राइबोफ्लेविन आणि झिंक हे घटक असतात. जे केसांसाठी चांगले मानले जातात. चिंचेचे सेवन केल्याने केस अधिक मजबूत होतात. याशिवाय चिंचेमध्ये स्कीन फ्रेंडली घटकही असतात जे त्वचेसाठी पोषक असतात.
- प्रवासाच्या वेळी बर्याच वेळा अस्वस्थ वाटत आणि उलट्या होतात. अश्यावेळी तुम्ही चिंचेचे सेवन करा. चिंच खाल्ल्याने मनस्थिती सुधारण्यास मदत होते. आणि उलट्यांचा त्रास कमी होतो.