हिरव्या टमॅटोचे आरोग्यासाठी होणारे फायदे

लाल टोमॅटोचा वापर आपण नेहमीच वेगवेगळ्या भाज्यांमध्ये करतो किंवा तसेही जेवताना खातो. लाल टोमॅटोचे आरोग्याला होणारे वेगवेगळे फायदेही तुम्हाला माहीत असतील.पण हिरव्या टोमॅटोच्या आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबाबत क्वचितच कुणाला माहीत असेल. एक्सुपर्टनुसार, हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, फोलेट, कॅल्शिअम, पोटॅशिअमसारखे पोषक तत्व आढळून येतात. जर तुम्ही यांचा डाएटमध्ये समावेश कराल तर तुम्हाला यातील अॅंटी इंफ्लामेट्री गुणांचाही फायदा मिळतो. हिरवे टोमॅटो खाल्ल्याने इम्यूनिटी मजबूत होते. तसेच त्वचेसाठीही हिरवे टोमॅटो खाणं फायदेशीर असतात.

डोळ्यांसाठी फायदा

डोळे हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही हिरव्या टोमॅटोंच सेवन करायला हवं. हिरव्या टोमॅटोंमध्ये बीटा-कॅरोटीन आढळतं, जे डोळे हेल्दी ठेवण्यासाठी आणि डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी मदत करतं.

इम्यूनिटी मजबूत होते

हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी इम्यूनिटी बूस्ट करतं. त्यामुळे हिरव्या टोमॅटोंचा आहारात समावेश कराल तर तुमची इम्यूनिटी मजबूत होईल.

ब्लड प्रेशरची समस्या दूर होते

हिरव्या टोमॅटोमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी हिरव्या टोमॅटोंचं सेवन करणं फायदेशीर असतं.

त्वचेसाठी फायदेशीर

आहारात हिरव्या टोमॅटोंचा समावेश करण्याचा आणखी एक मोठा फायदा होतो तो त्वचेला. हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. आणि सोबत यातील एंटीऑक्सीडंटने त्वचा हेल्दी राहण्यासाठीही मदत मिळते.

Share