लातुर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

लातूर : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊसाने झोडपले. लातूरवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या तळ्यातला महादेव पूर्णपणे पाण्यात बुडाला तर जुन्या गावभागात पावसाने नागरिकांची दैना उडवली.

लातूर शहर परिसरात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, रात्रीच्या सुमारास पुन्हा पावसाचे थैमान सुरू झाले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते,

 

दरम्यान, गावभागात अनेक ठिकाणी रस्त्याचे पाणी घरात घुसले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मुख्य चौक रस्ते, गाव भागातील रस्ते, बाजार पाण्याखाली गेला. गावभागात अनेक घरातून पाणीच पाणी झाले तर वाहने वाहून नुकसानही झाले.

Share